कारेगाव:- लोणार तालुक्यामध्ये सन 2022 खरीप हंगामामध्ये माहे सप्टेंबर व आक्टोंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन सडून नुकसान झाले.ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी तत्काळ पिक विमा कंपनीकडे तक्रार केली त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी यांनी स्थळ पाहणी करून पंचनामा करण्यात आला.त्यामध्ये काही शेतकरी बांधवानी तक्रार करून सुद्धा त्यांच्या शेतात कंपनीचे प्रतिनिधी आले नाही व त्यांच्या पिकाचा पंचनामा सुद्धा केला नाही. आतापर्यंत काही शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम हेक्टरी ११०००( आकरा हाजार) तर काहींना ९०००(नऊ हजार) रुपये मिळाले तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी २०००(दोन हजार) ते १०००( एक हाजार) कंपनीने शेतकऱ्यांची हेतू परस्पर थट्टा केली की काय आसे वाटत आहे. त्यामुळे ज्यांनी खरीप सोयाबीन पिक विमा भरलेला आहे त्यांना शासन निर्णयानुसार सरसकट मदत मिळावी अन्यथा दिनांक २१/१२/२०२२ रोजी पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास हजारो शेतकरी बांधवांना घेऊन तहसील कार्यालय लोणार येथे धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अक्षय गायकवाड,उद्धव नागरे,पंकज शेळके,संतोष घुले,अमोल आघाव ,समाधान घुले ,संदीप पिसे, शेख असिफ , इत्यादींनी दिला आहे.
