बातमीपत्र

लोणार तालुक्यातील शेगाव पंढरपूर पालखी महामार्ग वर असलेले सुलतानपूर येथील सकाळचे विद्युत भारनियमन बंद करून अपूर्ण राहिलेले कामे त्वरित करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने विद्युत वितरण विभागाच्या अभियंता यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी सुलतानपूर ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडीचे नेते संघपाल नागवंशी पनाड,युवा आघाडीचे नेते आनित्य घेवंदे,स्टार ग्रुपचे अध्यक्ष अखतर भाई, ग्रामपंचायत सदस्य संतोषराव शिंदे,अमीर भाई,राहुल पनाड,जाकीर खा,पठाण सद्दाम भाई, शंकर निळंक,सागर निर्मळे,खा गुलाब खा,पठाण शेख,लाल मिया शेख,वशीम शेख,सुभान जावळे,बबन पनाड,राजहंस जावळे आदी उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा