बातमीपत्र

लोणार तालुक्यातील अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करा- भाई अशोक जावळे- रिपब्लिकन सेना लोणार तालुका अध्यक्ष

लोणार तालुक्यात लोणार या ठिकाणी जागतिक खाऱ्या पाण्याचे सरोवर असल्यामुळे लोणार तालुका जगाच्या नकाशामध्ये नोंदला गेला आहे. परंतु याच तालुक्यात अवैध दारू आणि वारली मटका जुगार या अवैध धंद्याचा बाजार फार मोठ्या प्रमाणात राज रोस पणे वारली मटका जुगार सुरू आहे.गावागावात भाजीपाल्यांची दुकाने कमी दिसतात परंतु वारली मटका जुगार अवैध दारू यांचा व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने जास्त दिसतात यामुळे तालुक्यात लोकांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत.या धंद्यात व्यसनाधीन झालेल्या लोकांचे संसार उघड्यावर आलेले दिसत आहेत.दारू पिणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चाललेले आहे त्यामुळे चोऱ्या-माऱ्या,खून,भांडण झगडे याचे सुद्धा प्रमाण वाढलेले दिसून येत आहे हा सर्व प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे असे निवेदन लोणार तहसीलदार यांना देण्यात आले.जर यावर कारवाई झाली नाही तर भाई  अशोक जावळे रिपब्लिकन सेना लोणार तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात  दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सोमवारी लोणार तहसील कार्यालयासमोर ढोलताशे वाजवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन लोणार तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे निवेदनावर भाई सुरेश मोरे, जिल्हा सचिव रिपब्लिकन सेना दिलीपराव पंडागळे ,आदर्श मोरे, गौतम सदावर्ते , एकनाथ सदावर्ते, सुशील आनंदराव ,स्वप्निल अंभोरे, रवी अंभोरे ,अनिल पसरटे, रोशन अंभोरे, प्रज्ञाशील अंभोरे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत.

https://www.youtube.com/c/LiveMaharashtraNewsEntertainment


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा