बातमीपत्र

सप्टेंबर,ऑक्टोंबर 2022 मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकात पाणी साचल्याने पिके सडून नष्ट झाली होती.शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीसाठी आज १० एप्रिल रोजी अंजनी खुर्द मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. अंजनी खुर्द महसूल मंडळात सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी झाली होती मात्र प्रशासनाने अंजनी खुर्द मंडळाला अतिवृष्टीपासून वगळण्यात आले शेजारील सुलतानपूर मंडळ अतिवृष्टी मध्ये बसविण्यात येते मग अंजनी खुर्द मंडळ अतिवृष्टी मध्ये का बसविण्यात येत नाही या संदर्भात अंजनी खुर्द महसूल मंडळ मधील राजनी, धानोरा,शिवानी पिसा,अंजनी खुर्द,खळेगाव,महारचिकना,खापरखेड,कारेगाव, सोमठणा, ब्राम्हणचिकना, शिंदी,हिवराखंड व इतर गावातील शेतकऱ्यांनी डॉ सुरेश हाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. पुढील सोमवार पर्यंत कारवाई करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी पुन्हा तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला सदर आंदोलनाला लोणारचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी भेट देऊन शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना दिले यावेळी अंजनी खुर्द मंडळातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=QTlxtfMDkSI


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा