दिनांक १०/०७/२०२३ रोजी सुलतानपूर ग्रामपंचायतला सदस्यांनी आणि गावातील सामाजिक कार्यकर्तेनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देण्यात आले.
पावसाच्या पाण्यामुळे व गल्लीमधील सांडपाण्यामुळे गल्लीमध्ये फार चिखलमय वातावरण झालेले आहे. तरी आवश्यक ठिकाणी मुरुम टाकण्यात यावा. आणि वार्ड क्र. ६ मध्ये व वार्ड क्र. १/२ मध्ये ११/१२ दिवस झाले तरी पाणी पुरवठा झालेला नाही तरी आपण लवकरात -लवकर मुरुमाची व पाण्याची पुरतता करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हांडा वाजून आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते हजार होते संतोष राधाकिसन शिंदे , शेख अमीर शेख अहमद, जाकीर खान शौकत खान, गुलाबराव खोटे ईत्यादी हाजर होते.
