बातमीपत्र

उपविभागीय कार्यालयावर गायरान अतिक्रमण धारकांची दे धडक

लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील गायरान धारकांनी दिनांक १७/७/२०२३ रोज सोमवार लोणार तालुक्यातील सर्व गायरान अतिक्रमण धार कांनी एक निवेदन देऊन आमचे अतिक्रमण नियमा कुल करून भाडे पट्टे द्या अशा आशयाचे एक निवेदन सादर केलेले आहे. सविस्तर वृत्त की गेल्या 40 ते 50 वर्षापासून लोणार तालुक्यातील गोरगरीब भूमिहीन शेतमजूर धारकांनी आपल्या हाताला काम मिळावे म्हणून आणि आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने शासकीय गायरान ई क्लासच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले असून आज रोजी ताब्यात आहे आजपर्यंत शासनाने या विषयाकडे डोळे झाक केलेले असल्यामुळे गोरगरिबांच्या नावावर झालेल्या नाहीत म्हणून या लोकांना शेती संदर्भात अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे आता तरी शासनाने 1990 ते 93 च्या जीआर नुसार ह्या जमिनी नियमाकुल करून गोरगरिबांच्या नावावर करून भाडेपट्टे देण्यात यावे अशी मागणी होत आहे यासाठी उपविभागीय अधिकारी तथा न्याय दंडाधिकारी साहेब मेहकर कार्यालय यांना भाई सुरेश मोरे जिल्हा सचिव रिपब्लिकन सेना तसेच भाई अशोक जावळे लोणार तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात एक निवेदन सादर करण्यात आलेले आहे या निवेदनावर चंद्रकांत काकडे शंकर साठे भगवान ठोके विष्णू खिलारे अशोक सोनवणे रमेश गायकवाड सीताबाई प्रकाश साठे अलकाबाई विठ्ठल गवळी गयाबाई म्हस्के अशोक अवचार जिजाबाई जुमडे गयाबाई डोंगरे शशिकला बाई शिंदे भास्कर वहाग अनुसया बाई टेकाळे हसन खा शेख हनीफ भाई सुंदर तनपुरे संजय काकडे ब्रह्मानंद अवसरमोल शेषराव लहाने इत्यादी अनेक असे अतिक्रमण धारक उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा