बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील सुलतानपूर येथील जलजीव मिशनचे काम हे निकृष्ट दर्जाचे चालू असून कामामध्ये अनिमित्ता आढळून येत आहे.त्यामध्ये टाकी बांधकाम व पाईप - लाईनचे काम अंदाज पत्रकानुसार न करता टाकीचे काम माती मिश्रित खडी डस्ट च्या साह्याने करण्यात येत आहे.त्यामध्ये रेती कुठेही आढळून येत नसल्याचे दिसत आहे.शासनाच्या वतीने सुलतानपूर सह अन्य पाच गावासाठी २२ कोटी रुपये खर्च करून जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या योजनेचे काम सुरू आहे परंतु शासनाच्या योजनेला ठेकेदाराच्या वतीने हरताल फासण्यात येत असल्याचे दिसत आहे.
