बातमीपत्र

कारेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली

कारेगाव:- लोणार तालुक्यामधील कारेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. 
              दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व कार्यावर भरपूर असा प्रकाश अनेक अशा विश्लेषकांनी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार हे दैनंदिन जीवनात अमलात आणण्यासाठी भरपूर असे  मार्गदर्शन  सुद्धा अनेकांनी आपल्या- आपल्या भाषनामधुन व्यक्त केले. 
            शोषित,दलित,पीडित,वर्गाच्या वेदना आपल्या शब्दातून समर्थपणे मांडणारे महाराष्ट्राचे लोकशाहीर पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर ती उपेक्षितांच्या तळहातावर तरली आहे असा विचार मांडणारे प्रबोधनकार,लोककवी,परिवर्तनाला चालना देणारे समाजसुधारक लेखक,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठं योगदान देणारे,१३ लोकनाट्ये ,१३ कथा,६ नाटकं,३५ कादंबऱ्या,१५ पोवाडे,७ चित्रपटांचे कथालेखन व तसेच त्यांचे साहित्य जगप्रसिध्द सात भाषांमध्ये रुपांतरित झाले आहे.आशा महामानवाच्या जयंती साजरी करण्याकरीता गावातील गट ग्रामपंचायतचे सचिव कार्यक्रमासाठी उशिरा हजर होतात अशा ग्रामसेवकाबद्दल जनतेमध्ये नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा