कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या कल्पनेतून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षिकाचा आनंद मेळावा आडोली येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.
मतिमंद,मूक बधीर,अंध,कर्ण बधीर,विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षक शिक्षिकाना एक वेगळा अनुभव आला.या मेळाव्याचे उदघाटन जि.प.सदस्य सतीश पाटील,मुख्याध्यापक व्ही.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाले.उपस्थित शिक्षकांना दीपक घाटे यांनी मार्गदर्शन केले या मेळाव्यात शिक्षकांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सर्व शिक्षकांना वाकोबा देवराईची माहिती व्ही.पी.पाटील यांनी दिली.या मेळाव्यास 180 शिक्षक व शिक्षिका सहभागी झाले होते मेळावा यशस्वी करण्यासाठी सुहास कुरुकले, संजय बगाडे,काशीद सर आदी शिक्षकांनी योगदान दिले.
