बातमीपत्र

पुराच्या पाण्यात वाहून शेतमजूर बेपत्ता. 20 तास ओलांडून गेले तरी शव मिळाले नाही.

 लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील 52 वर्षे वयाचे सुधाकर लक्ष्मण काकड हे आज दोन वाजेच्या सुमारास बकऱ्यांना चारा  आणण्यासाठी नदी ओलांडून जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा ते आत्तापर्यंत सापडले नाहीत.
      काल स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव साजरा होईपर्यंत दबा धरून बसलेल्या पावसाने जणूकाही 16 आॅगस्टच्या सकाळी स्वतंत्र होऊन धो-धो बरसण्यास सुरुवात केली. पाऊस सततधार कोसळत असल्यामुळे आज कोणीही नागरिक  घराच्या बाहेर पडले नाहीत. परंतु ज्यांचे पोट हातावर आहेत अशांना बाहेर निघण्या वाचून पर्याय नसतो. असाच लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील सुधाकर लक्ष्मण काकड हे शेतमजूर आपल्याकडे असलेल्या शेळ्यांना चारा आणण्यासाठी घराबाहेर पडले असता गावाजवळ असलेल्या नदीचा प्रवाह ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या काही  लोकांनी पाहून आरडा-ओरडा केला. गावातील लोक धावत आले. परंतु पाण्याचा प्रवाह गतिमान असल्यामुळे सदरील व्यक्ती वाहून गेली. त्यास वाचवण्यासाठी  गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु  त्यात त्यांना यश आले नाही. या घटनेची खबर त्यातीलच काही जणांनी गावाचे पोलीस पाटील व सरपंच यांना दिल्यावर त्यांनी बिबी पोलीस स्टेशन व लोणार तहसील येथे घटनेची तोंडी माहिती सांगितली. त्यावरून लोणार तहसीलचे तहसीलदार श्री कवळे, नायब तसिलदार श्री जाधव, मंडळाधिकारी व्ही पि नागरे व अन्य तिथे जाऊन पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात शोधकार्य सुरू आहे. परंतु सायंकाळचे आठ वाजेपर्यंत वाहून गेलेली व्यक्ती सापडली नाही. रात्रीची वेळ असल्यामुळे व अंधारात काहीच दिसत नसल्यामुळे शोध कार्य थांबविले होते. आज दुसर्‍या दिवशी ही सकाळ पासून गावकरी तसेच तहसीलच्या कर्मचाऱ्यानी ती व्यक्ती वाहून गेलेल्या ठिकाणा पासून धरणातील जलसाठ्यात चारही बाजूंनी शोध घेतला तरी पण ती व्यक्ती आढळून आली नाही. शेवटी तहसीलदार कव्हळे यांनी डॉक्टरांशी संपर्क करुन मृत व्यक्ती पाण्यात मृत्यूपावल्यानंतर पाण्यावर तरंगण्यास किती अवधी लागतो. तेवढा अवधी होऊन गेल्या नंतर सुध्दा प्रेत न मिळाल्यामुळे हताश होऊन शोध कार्य थांबविले. व मासेमाऱ्यांची मदत घेऊन शोध करण्याचे ठरविले आहे. तरीही गावातील तरूण मंडळी धरणाच्या आजूबाजूला व नदीनाल्यांमध्ये शोध घेतच आहे. सदरील घटनेमुळे संपूर्ण चिखला गावावर शोककळा पसरली आहे.

​​Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
 
Follow Us On Social Media 
 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा