बातमीपत्र

ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्षपदी मा. खास. संजय पाटील

मुंबई,: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईशान्य मुंबई जिल्ह्या अध्यक्ष पदी उपनगर जिल्हाची पुन्हा एकदा मोठी जबाबदारी मा.खास.संजय पाटील यांच्यावर दिली आहे.संजय पाटील यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी नियुक्ती पत्र दिल्यानंतर मा. खासदार संजय पाटील  जयंत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संजय पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण ईशान्य मुंबई उपनगर परिसरात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व  कार्यकर्तेनी एकच जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संजय पाटील यांच्या नियुक्तीचे स्वागत केले गेले. गेली अनेक वर्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन वाढविण्यासाठी तसेच विविध प्रकारची जनआंदोलने, महामेळावे, चर्चा सत्र,कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात संजय पाटील यांनी भरीव कामगिरी केली आहे.
पाटील यांच्या मागील काळात असंख्य प्रश्र्नांची सोडवणुक झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे बोलले जाते. कार्यालयात येणाऱ्या समस्या, तसेच ‌ प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे.  संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर काही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

​​Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
 
Follow Us On Social Media 
 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा