भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या इंडियन ऑइल नगर समोरील कार्यालयावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून दरोडेखोरांनी कार्यालयातील कपाटे फोडली आहेत. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती परब यांचे समर्थक प्रदीप कुरतडकर यांनी दिली.
डी एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. पंचनामा झाला नसल्याने चोरट्याने नेमका किती ऐवज लंपास केला आहे, हे लगेच सांगता येणार नाही. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले.
Follow Us On Social Media
Web Site : - www.livemaharashtra.com
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
Download LIve Maharashtra App From Google Play store
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
