पर्युषण पर्वानिमित्त लोणारात शोभायात्रा जैन समाजाचे दि. ०६.०९.१८ वार गुरुवार पासुन आठ दिवसीय पर्युषण पर्व सुरू आहे. या आठ दिवसात जैन समाजाचे लहानात - लहान आणि मोठ्यात मोठा व्यक्ती सुद्धा तन-मन धनाने सहभागी होतोसकाळी ६.०० वाजेपासून धार्मिक कार्य सुरू होतात ९ वाजता प्रवचन दुपारी पूजा, कल्पसूत्र वाचन तथा लहान मुलांना धार्मिक कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता प्रतिक्रमन तसेच भक्ती संध्या अशा प्रकारे संपूर्ण आठ दिवसाची दिनचर्या असते गतवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा जैन समाजात स्वाध्यायी म्हणून चेन्नई येथून अमरभाई, धीरजभाई, शुभम तर अकोला येथुन बन्सीलाल राका, सुवालालजी राका, निलेशकुमार राका तथा विनाजी मेहता, कुसुमजी पुगलीया आलेले आहेत जैन समाजात तपस्या करण्याचे खुप महत्व आहे सध्या महापर्व सुरू असल्या कारणास्तव तपस्या करणे जोरात सुरू आहे आज सोमवारला कल्पसूत्र वाचन दरम्यान भगवान महावीरांचा जन्मोत्सव येत असल्या कारणास्तव जन्मोत्सव साजरा करण्यात आला दुपारी १ वाजता जैन मंदिरापासून चांदीच्या रथात भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवुन प्रताप चौक, सराफा लाईन, आनंद मंगल भवन येथे शोभा यात्रा विसर्जन करण्यात आले. भगवान महावीरांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला आज शिळा पोळा असल्याने रथ ओढण्याचे काम मुलांनी व महिलांनी केले या आठ दिवसात जैन बांधव रात्री भोजन त्याग, लीलोत्री त्याग तसेच जास्तीत जास्त धार्मिक कार्यात आपला वेळ घालवतात आज लोणार शहरात निघालेल्या शोभा यात्रेत गायक शेखर सुराणा सह मुनीसुवृत संगीत मंडळाचे सदस्य भक्ती प्रेम ग्रुप व आदींनी शोभा यात्रेची धुरा सांभाळली बॉक्स मध्ये पर्युषण पर्वाचे महत्व म्हणजे मागील वर्षा भरात केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केल्या गेलेल्या चुकांची माफी मागणे व माफ करणे हाच खरा उपदेश आहे बॉक्स आपल्या गावांचे ऋण फेडण्यासाठी वडील डॉ. अच्युत सीताराम सावजी व आई शैलेजा अच्युत सावजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पर्युषण पर्वाचे औचित्य साधुन राम, शाम, हेमलता सावजी यांनी आपल्या मानलेल्या आत्या शांताबाई कन्हेयालाल संचेती यांचे हस्ते जैन मंदिरास ४६ ग्राम सोन्याचे हार मंदिराचे विश्वस्त रमनलाल बोरा, शांतीलाल शिंगी यांचेकडे सुपूर्द केले
