बातमीपत्र

लोणार येथे १६.१०.२०१८ रोजी नवीन मतदार नोंदणी मोहीम

लोणार तालुक्यातील लोणार,सुलतानपूर,बीबी येथे विशेष मतदार मोहिमेचे आयोजन तहसील कार्यालय लोणार यांच्या वतीने राबवल जात आहे. दिनांक १६.१०.२०१८ रोजी लोणार येथील गजानन महाराज भक्त निवास,पंचायत समिती लोणार,बीबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी तर सुलतानपूर येथील वेदांत आश्रम जालना रोड सुलतानपूर येथे सकाळी १०.०० ते साय. ४.०० वाजेपर्यत विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन तहसीलदार लोणार यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तसेच ज्या नागरिकांचे वय ०१.०१.२०१९ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजेच ज्यांचा जन्म दिनांक ०१.०१.२००१ पूर्वीचा आहे त्यांनी फॉर्म क्रमांक ६ भरून आपले नाव नोंदवावे. त्याच प्रमाणे ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये असून त्यांच्या नाव,फोटो,वय,लिंग,जन्म तारीख ,पत्ता यामध्ये दुरुस्ती करायची आहे त्या मतदारांनी फॉर्म क्रमांक ५ भरून दुरुस्ती करून घ्यावी.तसेच ज्या मतदाराचा मृत्यू झाला आहे अशा लोकांचे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ भरावा.
सदर मतदार नोंदणीकरिता येताना खालील पुरावे सोबत आणावे.
१. पासपोर्ट साईज कलर फोटो २. आधार कार्ड झेरॉक्स 
३. रेशन कार्ड झेरॉक्स ४. शाळेची टि.सी. झेरॉक्स 
मतदार नोंदणीमध्ये सर्व नागरिकांनी हजर राहून सहकार्य करावे असे अवाहन लोणारचे तहसीलदार श्री. सुरेश कवळे यांनी केल.

 

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा