चिखली येथील महावितरनाच्या कार्यालयाकडुन सामान्य नागरिकांना आवास्तव बिल वारंवार देन्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रकारचा मनस्ताप होत आहे. तसेच महावितरनाच्या कार्यालयाच्या अधिकार्या कडुन शेतकऱ्यांना आलेली बिले दुरुस्त करण्यासाठी शिल्लक पैशाची मागणी होत असल्याची तक्रार दिली असता त्यांनी सात दिवसाची मुदत मागीतली परंतु पंधरा दिवस झाले तरीही कार्यवाही महावितरनाने केली नसल्याने 'स्वाभिमानी'शेतकरी संघटनेचे नेते मा.रविकांत तुपकरांनी शेकडो शेतकऱ्यांसह आज चिखली येथील महावितरणाच्या कार्यालयाचा ताबा घेतला.व शेतकर्याना आलेली अवास्तव बिले दुरुस्त करुन द्या.आन्याथा आम्ही कार्यालय पेटून देऊ असा कठोर इशारा दिला.
