मोताळा:- बुलडाणा येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा राहेरा, केंद्र-रोहिणखेड,पंचायत समिती- मोताळा येथे स्वेटर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पुणे येथील नुमान शाबाज खान इयत्ता सहावीतील विद्यार्थी याने राहेरा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना "एक हात मायेचा, एक हात प्रेमाचा" या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे येथील विद्यार्थ्याने राहेरा येथील विद्यार्थ्यांना केलेली मदत ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे. शाळेतील विविध उपक्रम निलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतात. दाते पुणे येथील शाबाज खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये मायेची ऊब म्हणून थंडीपासून रक्षण होण्यासाठी शाळेतील सर्व मुला-मुलींना अतिशय चांगल्या प्रतीचे स्वेटर नुमान चे प्रशिक्षक श्री प्रदीप जाधव यांच्यामार्फत पाठवून वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून अंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप जाधव यांचा जि प शाळेत गावकऱ्यांच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद रायपुरे, गावातील सरपंच सौ. रंजना गायकवाड, मधुकर शिरसाठ, विनोद जाधव, राजेश जाधव, दिनेश करडे, मधुकर जाधव, रविंद्र सुर्यवंशी, पांडुरंग ओरपे, गणेश जाधव, शुभम जाधव, उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामध्ये श्री प्रदीप जाधव यांनी त्यांचा जीवन प्रवास सांगत जीवनातील खेळाचे महत्व पाठवून दिले. यावेळी मधुकर शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर परिधन ड्रेसेस बुलढाणा चे मालक अभय जैन यांनी अतिशय योग्य दरात स्वेटर देऊन सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मित्र व मोठा भाऊ नुमान खान यांचे आभार मानले. नुमान व नुमान च्या परिवारास विद्यार्थ्यांनी व शिक्षक जुमडे आणि शिंदे यांनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत नुमानच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षक विजय जुमडे यांनी केले.
