बातमीपत्र

लोणार तालुक्यामधील आंजनी खुर्द औरंगाबाद महामार्गावर गावापासून पक्षिमेस 2 कि. मी. अंतरावर नदीवरील पुलाखाली दि 5 जानेवारी रोजी आज्ञात अवैध जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहन चालकाने सकाळी - सकाळी अंधाराचा फायदा घेऊन वाहनातील तिन मृत गाई कोरड्या नदीपात्रामध्ये टाकुन पसार झाला.सकाळी आंजनी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शिवानंद जाधव हे आपल्या दुचाकीवरून रस्त्याने जात असताना त्यांची नजर अचानक त्या मृत गाईकडे गेली. आणि त्यांनी आमच्या प्रतिनिधी सी संपर्क केला. प्रतिनिधीने सदर घाटाने बाबत मेहकर पोलीस स्टेशनला कळविले पोलीस स्टेशनचे कर्मचारी सानप (साहेब) यांनी घटना स्थळावर येऊन पाहणी केली यावेळी घटनास्थळी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रताप गायकवाड,शें. इस्माईल, गजानन गायकवाड, शें. हाबिब,कृष्णा खोटे, सुधाकर गवई, भागवत चव्हाण, रितेश धुळे, अनिल गायकवाड, सतिश गायकवाड, यांनी व ग्रामस्थानी मृत गाईच्या प्रेताची अव्हेलना होऊ नये म्हणून जेसीबीने खोल खड्डा करून त्यांचा मृत देह जमिनीत पुरण्यात आला.

Follow Us On Social Media 

Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
DONATE TO SUPPORT POOR AND NEEDY PEOPLE TO GROW INDIA
 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा