परतूर विधानसभेतील तळनी सर्कल मध्ये जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बबनरावजी लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन युवानेते राहुलभैय्या लोणीकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले या निमित्ताने किर्ला या गावात बंजारा समाजातील महिलांनी वाजत गाजत राहुल लोणीकर यांची मिरवणुक काढली ,तसेच वडगांव सरहद्द येथील महीला बचत गटाच्या महीला सदस्यांनी राहुल लोणीकर यांचे स्वागत केले, तळनी सर्कल मधील सरहद वडगाव , कोकरांबा , शिरपूर , देवठाणा , कानडी , इंचा, टाकलखोपा , वाघाला , दुधा , कीर्ला आणि जांभरुन येथे हे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या सोबत गणेशराव खवने , संदिप गोरे , संभाजीराजे खंदारे , गजानन देशमुख , दारासिंग चव्हाण , अनिल खंदारे , राजेश मस्के , दत्ताराव कांगणे , नवनाथ खंदारे यांच्या सह पदाधिकारी होते.
