लोणार तालुक्यातील खळेगाव येथे सात दिवस सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे दिनांक २२ जानेवारी रोजी सांगता झाला सप्ताहाचे आयोजन भगवानबाबा गणेश मंडळ व संपूर्ण खळेगाव वासियांनी केले होते कथेचे वाचन अनंत श्री विभूषित महामंडलेश्वर ह.भ.प.कृष्णाला चैतन्य महाराज यांचे भागवत त्यांच्या अमृत वाणीतून करण्यात आले दैनंदिन नगर प्रदक्षिणा,भागवत कथा,हरिपाठ ,व रात्री ९ वाजता हरिकीर्तन व दररोज भगवान भक्तांकडून दोन वेळेस अन्नदान सात दिवस सुरु असते.या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी हजेरी लावली व खळेगाव परिसरातील भाजपचे भावी आमदार डॉक्टर गणेश मान्टे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भगवानबाबा गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम केले.
