भगवान नागरे यांनी खळेगाव येथील जगदंबा माता परिसरातील जी वृक्ष लागवड केलीगेली त्याचा संगोपनासाठी श्री नागरे यांनी संबंधित विभागाला मागणी करूनही त्यांना अपयश आले त्यामुळे त्यांनी २३ जानेवारीरोजी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यांनी वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या मागण्या ह्या त्यांच्या स्वार्थासाठी नसून त्या समाजोपयोगी असल्याने लोणार पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी आपल्या सहकाऱयांसोबत उपोषणसुरुं असलेल्या ठिकाणी भेट दिली त्यावेळी त्यांच्या सोबत विस्तार अधिकारी शंकर ठोके सचिव तेजनकर सरपंच राजेश सानप ,वसंता नागरे,पत्रकार बाबारावजी मुंढे,संतोष वायाळ,किशोर नागरे,लिंबाजी मुले रहमत अली,राजू नागरे, रवी वायाळ,तलाठी दादंडे,गजानन नागरे समाधान जाधव विजय नागरे यांच्या उपस्थितीत सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी भगवान नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व लिंबू शरबत देऊन उपोषणाची सांगता केली. चार दिवस चाललेल्या उपोषणाकडे लोणार तहसील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.
