धानिव बाग मैदान नालासोपारा (पुर्व) येथे भारिप बहुजन महासंघ,पालघर जिल्हा व वसई विरार जिल्हयाच्या वतीने सत्ता संपादन संकल्प मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला.पालघर जिल्हयातुन विविध भागातुन मोठया प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.महिलांचा हि मोठया प्रमाणात सहभाग होता.भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन जेष्ठ कार्यकर्ते अंकुश बचुटे यांनी केले.या कार्यक्रमाला सुरेंद्र बनसोडे,ठाणे जिल्हा निरीक्षक,अनिल भगत,माजी अध्यक्ष मिरा भाईंदर जिल्हा,मंगेश वाघमारे,वसई विरार जिल्हा अध्यक्ष,अहमद सैय्यद,भा.ब.म.भिवंडी जिल्हा महासचिव, डि.एस.गायकवाड,जेष्ठ कार्यकर्ते भा.ब.म.भिवंडी जिल्हा.शंकरराव इंगले,प्रदिप शिंदे उपस्थित होते.
