प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व नितीनजी गडकरी यांच्या महत्वाकांक्षी योजनेतून तयार होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीमध्ये वास्तवापेक्षा साधन संपत्ती दाखवून काही ठराविक शेतकऱयांबरोबर आर्थिक देवाणघेवाण करून संबंधित अधिकाऱ्यांनी आपलेही हात समृद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणाजिल्ह्यातील लोणार,मेहकर तालुक्यात घडत असल्याची खमंग चर्चा सध्या परिसरामध्ये जोर धरू लागली आहे. पडीक जमीन या महामार्गात गेली असताना देखील बागायती शेती दाखवून फार मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून दिला गेला व ज्या शेतकऱयांच्या खरोखरच बागायती शेती या महामार्गात गेल्या त्यांची ती शेती कोरडवाहू दाखवल्याची धक्कादायक बाबसमोर येत आहे या मध्ये अधिकारीवर्गाचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे तरी या सर्व बाबी लक्षात घेता फेरतपासणी करून शेतकर्याना न्याय मिळावा अशी अपेक्षा स्थानिक करत आहेत व दोषी अधिकाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी जनतेकडून होत आहे.
