खळेगावमध्ये शहिद नितीन राठोड यांना एकता युवा मित्र परिवार यांचा वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांपैकी २ जवान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्यातील लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील शाहिद नितीन राठोड यांना खळेगाव वाशियांच्या वतीने व ज्यांचा समाजातील बांधिलकी जपण्यासाठी नेहमीच मोठा वाटा असतो अशा एकता युवा मित्र परिवाराच्या वतीने शहिद नितीन राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबनरावजी नागरे यांनी शाहिद नितीन राठोड यांनी देशासाठी दिलेले बलिदान हे चिरंतर राहील भारत देश कधीच विसरणार नाही अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.
