साखरख्रेर्डा येथे आंणि परीसरातील खेड्यापाड्या शहीद जवानांच्या बलीदानानिमीत्त ठिकठीकानी श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. तर दोन दिवस कँन्डल मार्च आणि एक दिवस साखरखेर्डा बंद ठेवून पाकिस्थानचा निषेध करण्यात आला. आर सी एफ मध्ये कार्यरत सिंदखेडराजा मतदार संघातील चोरपांग्रा (गोवर्धन नगर ) येथील नितीन शिवाजी राठोड आणि मलकापूर येथील संजयसींग राजपूत हे दोन जवान जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथील स्पोटात शहीद झाले.बुलडाणा जिल्हयातील दोन जवान शहीद झाल्याने प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आश्रू अनावर झाले होते.गोवर्धन नगरात शोकसागर अवतरला शहीद जवानांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ साखरखेर्डा येथे १५ फेब्रुवारीला अनिकेत सैनिक स्कूलच्या वतीने कँन्डल मार्च काढण्यात आला १६ फेब्रुवारीला रात्री पुन्हा सर्वपक्षीय,सर्व धर्मीय कँन्डल मार्च कांढून पाकिस्थानच्या पंतप्रधानांचा पुतळा बस स्थानकावर जाळण्यात आला. तर १७ फेब्रुवारीला पुन्हा साखरखेर्डा व परीसरात बंद पाळून निषेध करण्यात व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा परीषद सदस्य रामभाऊ जाधव , सरपंच महेद्र पाटील, अजीम नवाज राही, माजी सैनिक अर्जून गवई, माजी सैनिक शंकर मोरे, मेजर प्रकाश घोडके, नायक नाथा गवई, माजी सैनिक महादेव गवळी, माजी सरपंच कमलाकर गवई, उपसरपंच आयूबसेठ कुरेशी, माजी उपसभापती सुनिल जगताप, शिवराज मुदमाळी, ग्राम पंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी , माजी उपसरपंच असलम अंजूम, सय्यद रफीक, रफीक प्यारे, नंदकिशोर कोतवाल व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
