बातमीपत्र

बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.- ७७७ अंतर्गत संघमित्रा महिला मंडळ,गोकुळ टाऊनशिप,विरार (पश्चिम) या संस्थेच्या वतीने "राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमाता रमाई" यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.विशेषतः या कार्यक्रमात तिन्ही महामातांच्या जीवनातील काही पैलूंवर उजेड टाकून सदर महिला मंडळाच्या भगिनी शुष्माताई अहिरे (जिजाऊ), माधवीताई बचुटे (सावित्रीमाई) व अलिशाताई जाधव (रमाई) यांनी या तिन्ही महामातांचे विचार समाजात विसर पडत चाललेल्या तरुणाईंना आपल्या संवादातुन पुन्हा त्याची जाणीव करून दिली व सुत्सावलेल्या समाजाची व झोपेचे सोंग करून झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला तिन्ही महामांच्या विचारांचा वसा घेऊन समाजात कार्य करणाऱ्या भगिनीना "राष्टमाता जिजाऊ, क्रांतीज्योति सावित्रीमाई फुले व त्यागमाता रमाई पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले.तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना "सन्मान चिन्ह" देऊन गौरवीण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात बौ.पं.स.मध्यवर्ती कार्यालय भोईवाडा परेल मुंबई येथील उपकार्याध्यक्ष मा.विनोदीजी मोरे व सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.तसेच नुकत्याच आतंकी हल्ल्यामधे शहीद झालेल्या आमच्या शुरवीर सैनिकांना व शाखेचे माजी अध्यक्ष दि.वसंत जी. सावंत व सल्लागार दि.जितेंद्र पां. सावंत यांना मुक श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड शाखेचे चिटणीस आयु.हेमंत व.सावंत यांनी सदर महिला मंडळाच्या सल्लागार आष्युमानीनी मनिषाताई खिल्लारे यांच्या नावाची सुचना करून शाखेचे उपाध्यक्ष आयु. संदिप वि.अहिरे यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा