एकता युवा मित्र परिवाराने केला वृक्षमित्र भगवानराव नागरे यांचा सत्कार शासनाकडे केली पुरस्कार देण्याची मागणी सध्या या धावपळीच्या जगात स्वार्थ व संसार बाजूला ठेऊन ज्यांनी खळेगाव च्या जगदंबा मातेच्या मंदिर परिसर मध्ये एकूण तीन ते चार एकर जमिनीवर साक्षात स्वर्ग बनविला आहे त्यांनी त्या परिसरात पडीक जमिनीवर २६ जातीच्या जीवनउपयोगी झाडांची लागवड करून त्यांना मोठे केले याकडे लोणार तालुका सुरेश कव्हके व बी.डी.ओ. स्मिता पाटील यांनी भेटदेऊन कौतुकाची थाप पाठीवर दिली परंतु अशा व्यक्तीला फक्त कौतुक पुरेशे नाही तर त्यांचा संम्मान झाला पाहिजे असे स्थानिकांचे मत आहे शासन वृक्षलागवडीवर कोठयावधी रुपये खर्च करून सुद्धा झाडे फक्त कागदावरच दिसतात परंतु वृक्षप्रेमी भगवान नागरे सारखी व्याक्ती समाजात खरंच कामकारुन दाखवत असेल तर त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायला हवे असे मत एकता युवा मित्र परिवाराने यावेळी व्यक्त केले.यावेळी साहेबराव नागरे ,दादाराव जाधव,विकास कराड,रवी क्षीरसागर,रमेश बोहतुर,उमेश इंगळे,सोनू वायाळ,रामू वायाळ,सोहिल शेख,तोफीक शेख,इतरही मंडळींची उपस्थिती होती.
