बातमीपत्र

वरळीयेथील मरिअम्मा नगर मध्ये दरवर्षी एम पी एल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले जाते वरळी विभागातील बहुतेक क्रिकेट संघ या मरिअम्मा नगर प्रीमियर लीग मध्ये भाग घेतात विभागातील सामाजिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील नामवंत पाहुणे या क्रिकेट लीगला भेट व शुभेच्छा देण्याकरिता हजेरी लावतात स्थानिक नगरातील रहिवाश्यांचा या स्पर्धेला चंगल्या प्रकारे पाठिंबा असल्याचे पाहायला मिळाले पुलवामा येथील हल्यात शहीद जवानांना प्रथम श्रद्धांजली वाहून या ठिकाणी आज स्थानिक आमदार सुनिलजी शिंदे व माजी आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेकी मनसेचे वरळी उपविभाग अध्यक्ष दादा गावडे, लिव्ह महाराष्ट्र न्युज वृत्तवाहिनीचे पत्रव्यवहार प्रमुख विजय सापळे, लिव्ह महाराष्ट्र न्युज वृत्तवाहिनीचे कोकण संपर्क प्रमुख अनिल राजिवले तसेच लिव्ह महाराष्ट्र न्युज या वृत्तवाहिनीचे संपादक/संचालक अनिल कांबळे हे देखील या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित होते हि प्रीमियर लीग मरिअम्मा नगरातील आयोजक अल्ताफ शेख,अवधूत साळुंखे,अमित मंडळ,कार्तिक देवंद्र यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते या वर्षी या स्पर्धेचे तिसरे वर्ष साजरे होत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा