लोणार तालुक्यामधील कारेगांव येथे महाशिवरात्रीनिमित्त किशोर वानखेड़े यांच्या शेतात अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सप्ताहचे चौथे वर्ष आसुन शिवमाहापुरान कथा ही प्रवक्ते श्री.ह.भ.प.राम महाराज गाडेकर तर भागवत कथा प्रवक्ते श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गाडेकर यांच्या मुख वाणितुण करण्यात आली.श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर माहाराज तायडे यांचे किर्तन झाले.दरदिवशी वेगवेगळ्या अन्नदात्यांकडून या ठिकाणी अन्नदान केले जाते दि.05/03/2019 रोजी दुपारी १२ (बारा) वाजता काल्याचे किर्तन हे श्री ज्ञानेश्वर माहाराज गाडेकर यांचे होनार व त्यादिवशीचे अन्नदान समस्त गावकरी मंडळी कारेगांव यांच्या वतीने असणार आहे तरी या महाप्रसादाचा लाभ हा सर्व भक्तानीं व परिसरातील भावीक भक्तानीं लाभ घ्यावा असे आव्हान किशोर वानखेड़े व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.
