बातमीपत्र

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरपांग्रा येथील जवान नितीन राठोड शहीद झालेले त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथील श्री अंबाबाई देवस्थानाकडून शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना पाच लाख पन्नास हजाराचा धनादेश देण्यात आला.दिनांक 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्री अंबाबाई देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या वतीने श्री बी. एन. पाटील देवस्थान सदस्य, श्री शिवाजी जाधव देवस्थान सदस्य व शिवाजी पोवार देवस्थान सचिव यांनी शहीद नितीन राठोड यांच्या गावी भेट दिली. ज्या ठिकाणी शहीद नितीन राठोड यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्या स्थळी नतमस्तक होऊन मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन शहीद नितीन राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहीद नितीन राठोड यांची पत्नी शासकीय कामानिमित्त मुंबई येथे गेले असल्याने पाच लाख पन्नास हजाराचा धनादेश त्यांचे आई- वडील यांच्याकडे सुपूर्त केला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा