महाराष्ट्र राज्य सध्या दुष्काळात होरपळून निघत आहे त्यातच मराठवाडा मागील सहा वर्षा पासून सतत दुष्काळाचा सामना करत आहे.पिण्याच्या पाण्या सह गुरेढोरे यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे सुध्दा शेतकरी यांना जीकरीचे झाले आहे.याच पार्श्वभूमी वर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळाची तत्काळ बैठक घेऊन दुष्काळी भागाची पाहणी करण्यास सांगितली याच पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी आज जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त भागाची पहाणी केली आणि प्रशासनाला तत्काळ मदत पुरवण्या साठी सूचना केल्या.
