बातमीपत्र

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गेल्या कित्येक महिन्यापासून भांडुप पश्चिम विभागात चोरीचे आणि घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. असाच एक प्रकार प्रभाग क्र.११५, मधील समर्थ नगरात परवा घडला.

अमिनाबाई चाळ येथे राहणाऱ्या रुद्रकांत महादेव लाड यांच्या बाबतीत घडला. चोरट्यांनी दरवाज्याचा कडी-कोयंडे उचकटून टाळे तोडण्याचा प्रयत्न केला. पण  सतर्कतेमुळे तो अयशस्वी झाला.
लाड यांनी तातडीने मनसे रस्ते,साधन-सुविधा व आस्थापनाचे एस वार्ड प्रभाग संघटक  संतोष पार्टे यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. मनसेचे दिपेश जांभळे, जयेश परब व रुद्रकांत लाड यांनी लेखी तक्रार भांडुप पोलीस स्टेशनला दिलेली आहे. भांडूप पोलीस आपल्या पध्दतीने योग्य प्रकारे तपास करत असल्याचे कळते.भांडुपकर नागरिकांनी अशा परिस्थितीत  कुठलीही भीती न बाळगता सतर्क राहून आपल्या कुटूंबाची तसेच आजूबाजूच्या नागरिकांची काळजी घ्यावी.भांडूपमधून बाहेर जाताना आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला घरात राहण्यासाठी सांगावे.
तसेच आपल्या शेजारी असलेल्या नागरिकांना ह्याची जाणीव करून द्यावी जेणेकरून तेही तितकेच सतर्क राहतील. आपल्या परिवाराची व विभागातील नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन
महाराष्ट्र सैनिक जयेश परब यांनी  केले आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा