बातमीपत्र

भांडुप(पश्चिम) विभागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर पन्नालाल कंपाऊंड येथील रस्त्यावर अनेक खड्डे

भांडुप(पश्चिम) विभागातील  लाल बहादूर शास्त्री मार्गावर पन्नालाल कंपाऊंड येथील  रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.या ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरणाकरीता वापरण्यात आलेल्या लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत वाहनांचा अपघात तसेच एखादी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जातेय.या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे अक्षरशः कंबरडे खिळखिळे झाले आहे. महाराष्ट्र सैनिक प्रितम जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापनाचे प्रभाग संघटक संतोष पार्टे यांना या मार्गाची दयनीय स्थिती सांगितल्या नंतर मनपाच्या एस विभागाशी संपर्क साधून तात्काळ मुख्य रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
 मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना संतप्त शब्दात मनसे स्टाईलने ताकिद दिल्यानंतर रात्री तातडीने त्या ठिकाणचे  सर्व खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितल्याचे समजते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा