बातमीपत्र

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बिबी शाखेत कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासस समोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील शाखेत कर्मचारी वाढवून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी अशी मागणी परिसरातील बँकेच्या खातेदारांकडून होत आहे. बीबी येथे असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेतून जवळपास बारा ते पंधरा गावच्या लोकांचे आर्थिक व्यवहार चालतात. बँकेतून बचत खाते, कृषी खाते, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे व विविध प्रकारच्या शासनाच्या योजंनाचे लाभ आणि कर्ज प्रकरणाच्या बाबी या बँकेतून चालतात. त्यामुळे शाखेमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी असते. तर कधीकधी लिंक नसल्यामुळे कामे जास्त वाढतात व ग्राहकांची तुंबळ गर्दी वाढते. परंतु येथे असणारी कर्मचाऱ्यांची कमी संख्या ग्राहकांच्या अडचणीत जास्त भर घालते. त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या खातेदारांना, वृध्द व सर्व प्रकारच्या ग्राहकांना नाहक मन:स्ताप सोसावा लागत आहे. एखाद्या साध्या कामासाठी त्यांना वारंवार बँकेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे ग्राहक अक्षरशा वैतागून गेले आहेत. त्यामुळे बँक मध्ये कर्मचारी वाढवून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा