बातमीपत्र

गणेशपूर येथील झोपडपट्टी धारकांनी विधानसभा मतदानावर जाहीर बहीष्कार टाकत दिले निवेदन

मौजे गणेशपूर येथील दुर्लक्षीत झोपडपट्टीतील जनता लोकशाही पध्दतीने या निष्क्रिय लोकप्रतिनिधी व अकार्यक्षम अधिकारी यांच्याकडून गणेशपूर येथील वार्ड क्र 2 च्या झोपडपट्टीला गावातील मुख्य रस्त्यांशी जोडून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.तेव्हा आगामी विधानसभेच्या निवडणूकीला आपले अमूल्य मत कोणालाही न देता तटस्थेची ठाम भूमीका घेत मतदानावर जाहीर बहीष्कार बाबतचे निवेदन मार्फत मा.तहसीलदार,खामगांव जिल्हाधिकारी, बुलडाणा यांना दिले.
        यावेळी निवेदन स्विकारतांना मा.श्री.किटे साहेब नायब तहसीलदार खामगांव व निवेदन सादरकर्ते जागृक मतदार संदीप पवार,ज्ञानेश्वर डवंगे,प्रदीप उगले,नागेश्वर ढोके,सहदेव इंगळे,शाहरुख शेख,शंकर लठाड व इतर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा