बातमीपत्र

शेतीचे नुकसान पाहुन महिलेचा मुत्यु

शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने शेतमालाचे केलेले नुकसान पाहुन तालुक्यातील कारेगाव येथील महिला शेतकरी कमलाबाई प्रल्हाद केंधळे वय ५५ वर्ष यांना हृदय विकाराचा तीव्र झटका येवून आपल्या शेतातील सोयाबीन च्या सुड़यां जवळच मृत पावल्याची घटना आज दिनांक ५ नोव्हेम्बर २०१९ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास  घडली.
याबाबत सविस्तर  कारेगाव येथील  कमलाबाई प्रल्हाद केंधळे ह्या आज पावसाने उघाड़ घेतल्या नंतर दुपारी २ च्या सुमारास आपल्या कारेगाव शिवारातील गट नं २६६ मधील शेतात सोयाबीन सुडी पांगवत असतांनी सुडी सडलेल्या अवस्थेत दिसली असतांना  यावेळी पावसाने केलेले सोयाबीन चे नुकसान पाहून त्यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का लागून  सोयाबीन सुड़यां जवळच  त्यांचे निधन झाले घटनेची माहिती कारेगाव शिवारात पावसामुळे झालेल्या  नुकसानीचा सर्वे करणाऱ्या तलाठी यांना कळताच  तलाठी  राजेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून घटनेची माहिती तहसीलदार लोणार यांना दिली. आहेत. त्यांचे पछ्यात त्यांना २ मुले  एक मुलगी असुन त्यांचेकडे १.८० हे आर जमीन आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा