बातमीपत्र

सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार

राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आता आमंत्रण दिले आहे.त्यामध्ये राष्ट्रवादी यशस्वी ठरेल असे म्हटले जात आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यात।आघाडी करून निवडणुका लढवल्या होत्या. एकीकडे काँग्रेसचे बडे नेते राज्यातील प्रचारापासून दूर असतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात झंझावाती प्रचार करत आघाडीला अनपेक्षित यश मिळवून दिले.त्यामुळे काँग्रेसचे आमदारही खाजगीत याचे श्रेय शरद पवार यांना देताहेत. दरम्यान सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेससोबत शिवसेनाही पाठिंबा देईलअसे बोलले जात आहे. मात्र त्यासाठी पडद्यामागे काय हालचाली होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

राज्यातील राजकीय पेच सुटण्याऐवजी अजूनच वाढत आहे. रविवारी भाजपने राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर राज्यपालांनीही शिवसेनेला सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिली, पण सेनाही सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला तिसरा मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तत्पुर्वी राज्यपालांच्या बोलण्यावरुन अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आदी नेते राजभवनाकडे दाखल झाले होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “आम्हाला राज्यपालांनी बोलवले होते. भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापन करू न शकल्याने तिसरा मोठा पक्ष म्हणून त्यांनी आम्हाला सत्ता स्थापनेबाबतपत्र दिले आहे. आम्हाला त्यांनी उद्या संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. आम्ही आमचा सहकारी पक्ष काँग्रेसशी बोलणी करुन पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा