आज दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कल मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दुध दर वाढीसाठी सर्कल मधील गोरेगांव ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्यात आले
यावेळी गोरगरीब जनतेला दूध वाटप करण्यात आले आणि या महाविकस आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपचे युवा नेते उध्दव लंबे पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते उल्हासराव देशपांडे,वैभव तुपकर, ज्ञानेश्वर खरात पाटील, हभप.खुशाल महाराज शिंगणे,सुनिल कव्हळे,योगेश बापू देशमुख,समाधान कऱ्हाडे,रवी जगताप सकाळचे पत्रकार भगवान नालेगांवकर आणि अट्टल मत न्युज चॅनलचे पत्रकार शिवव्याख्याते सचिन खंडागळे सर तथा समस्त भाजपा व महायुवतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
