शेदूरजन येथे गोवर रूबेला जनजागरण प्रभात फेरी निघाली असता वसंत राव नाईक विद्यालय शिवप्रसाद धनराज चौधरी प्राथमिक शाळा व नेताजी सुभाषचंद्रबोस विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंदुर्जनचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते तशेच डॉ. संदीप कुमार सुरशे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.सर्व शाळेचे मुख्याध्यापक व नोडल शिक्षक आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती मीनाक्षी गवई ,एके नेवरे, श्रीमती पि. एम. कोवे,आरोग्य सेविका श्री बि.यु. गाढवे आरोग्य सेवक,तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी म्हस्के साहेब व लिपिक भगवान जाधव यांनी सहभाग घेतला.आपण सर्व मिळून गोवर रुबेला आपल्यापासून पळून लावू सर्व विद्यार्थी माझ्या सोबत सहभागी राहतील अशी आशा डॉक्टर संदीप कुमार सुरशे यांनी व्यक्त केली.
