जालना जिल्ह्यातील संपुर्ण जयपुर सर्कल परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले.एरडेश्वर मध्ये शेतात जाणारा रोडवरील पुल आवकाळी पावसाने वाहुन गेला व तसेच ठिकठिकाणी शेतात वीज पुरवठा पोल पडले. आतिवृष्टी मुळे शेतकर्याच्या शेतातील पिकांचे व शेतात जाणार्या रस्ताचे खुप मोठे नुकसान झाले.सतत काही महिन्या पासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडीद, कापूस या पिकांचे खूप नुकसान झाले.कोरोणा व अतिवृष्टी यामध्ये अडकलेला शेतकरी राजा याला यामधून कोण वाचविणार हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.तरी शासनाने त्वरीत या सर्व घटनेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन दखल घ्यावी अशी मागणी जयपूर जि.प.सर्कल चे सदस्य व मा.समाजकल्याण सभापती श्री.दत्ताभाऊ बनसोडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
