तालुक्यातील विविध कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देऊन लसीकरण आणि टेस्टिंग करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ किसन राठोड यांच्या कडून आढावा घेवून, सर्वांना योग्य सूचना तथा मार्गदर्शन करण्यात आले. भेटीदरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबी ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन चालू असलेल्या लसीकरणाबाबत चौकशी केली. यावेळी त्यांच्या सोबत ग्रा रू बिबी वैद्यकीय अधिकारी डॉ. जायभाये, डॉ. मुंढे, राजेंद्र रिंढे, डॉ बंगाळे, डॉ इंगोले तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
