बातमीपत्र

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राजसाहेब ठाकरे यांनी घेतली भेट

ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असताना एका फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज ठाण्यातील या रुग्णालयात जाऊन त्यांची व्यक्तिशः भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. \"लवकर बऱ्या व्हा. बाकी अनधिकृत फेरीवाल्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो\" अशा शब्दांत मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना धीर दिला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा