बातमीपत्र

खेळ असो व्यायाम विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबर खेळात प्रगती केली पाहिजे - नगरसेविका जागृती पाटील

खेळ असो किंवा व्यायाम प्रामाणिकपणे निष्ठेने जर कोणताही खेळ केला तर खेळात निश्चित तुम्हाला उज्ज्वल यश मिळविता येते, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक 116 च्या नगरसेविका जागृती पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त यशवंत चांदजी सावंत विद्यालयात व्यक्त केले. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन.हा दिवस एका राष्ट्रीय हॉकीपटूचा जन्मदिवस साजरा केला जातो.भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, हॉकी सारख्या खेळांमध्ये त्यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्म दिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ही अभिमानाची व गौरवास्पद कामगिरी आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून भांडुपच्या यशवंत चांदणी सावंत विद्यालयाच्या संचालिका सौ. नयना शाम तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत चांदणी सावंत स्पोर्ट्स अॅकेडमीच्या वतीने विविध प्रकारच्या खेळाचे प्रकार, प्रकार पाहून मला खूप समाधान झाले. विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल फिटनेसची आवड निर्माण व्हावी, या हेतूने हे सर्व खेळाचे प्रकार होते .हे देखील मला आज समजले. माझ्या बालपणाची मला आठवण झाली .प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात प्रगती केली पाहिजे. खेळ असो किंवा व्यायाम प्रामाणिकपणे निष्ठेने जर कोणताही खेळ केला तर निश्चित तुम्हाला उज्ज्वल यश मिळेल असे प्रतिपादन, जागृती पाटील यांनी व्यक्त केले. नयनाताई तुम्ही विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा विचारविनिमय करून विविध खेळांच्या स्पर्धाच्या माध्यमातून शाळेतून खेळाडू,पंच, तयार करून यशस्वी क्रीडा संघटक तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहात याचे मला खूप समाधान वाटतेय असे मार्मिक विचार नगरसेविका जागृती पाटील यांनी प्रसंगी मांडले २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व विजयी उपविजयी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रो कबड्डी पंच ख्यातनाम खेळाडू आरती अजय बारी, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक राजन अनुभवणे, भाजपा युवा महामंत्री कौशिक पाटील, लोकशाही वाहिनीचे पत्रकार चेतन सावंत, सामाजिक कार्यकर्ते भाऊ गावडे, यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सन्मानित करण्यात आले . यशवंत चांदणी सावंत स्पोर्ट्स अॅकेडमीच्या सर्व खेळाडू, गोविंदा पथकातील सर्व महिला गोविंदा, यशवंत चांदजी सावंत विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. खेळात व्यायाम, फिझिकल फिटनेससाठी संतुलित आहार आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढेल, या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा ऊर्जा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असेही मौलिक विचार नयना शाम तावडे यांनी मांडले. राष्ट्रीय खेळाडू व ख्यातनाम पंच संदीप चव्हाण, राष्ट्रीय प्रशिक्षक व जेष्ठ कबड्डी संघटक सुरेंद्र मंचेकर सर यांनी उपस्थितांचे शाल तुळशी वृंदावन व श्रीफळ देऊन सन्मान केला. . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा