बातमीपत्र

संतश्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठान बुलढाणा -जालना वतीने 'प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न' सन्मानाने सन्मानित मा. गौरवजी कायंदे व गुणवंतांचा सत्कार सोहळा

दिनांक 25 जून रोजी योगीराज लाॅन देऊळगाव राजा येथे मा.तोतारामजी कायंदे (माजी आमदार)यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार  पडला यावेळी 
ह भ प सानप गुरुजी , प्रा.गंगाधरजी कायंदे ,मा राजेंद्रवाघ ,मा.जालिंदरजी बुधवत ,मा विनोदजी वाघ ,सौ.नंदाताई कायंदे, सौ.शारदाताई जायभाये, मा आत्मारामजी कायंदे ,मा.भगवानजी मुंडे ,मा.देवानंदजी कायंदे,मा.मधुकर जायभाये ,मा.दादाराव खाडे ,मा गणेशजी मांटे,मा.प्रकाशजी गीते ,मा.रमेशजी कायंदे,मा.तोताराम  नागरे ,मा सावळारामजी नागरे ,मा बद्रीभाऊ बोडके ,डॉ केशव आघाव ,मा युवराज नागरे, मा शंकरराव उगलमुगले, वामनराव आघाव,प्रवीण गीते,सदाशिव मुंडे अमोल काकड,अविनाश डोईफोडे व मा.गौरव जी कायंदे यांचा पूर्ण परिवार उपस्थिती होता .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतश्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक विलास जायभाये यांनी केले  प्रतिष्ठानची संकल्पना विस्ताराने मांडताना वर्ष 2000 पासून समाज संघटनेचे काम करत असताना समाजाचा सामान्य माणसाला समाजाविषयी आपुलकी व अभिमान प्रकर्षाने कायम जाणवत आला. यानंतरच्या आपल्या कामाला संतश्री भगवानबाबांनी शिक्षणाचा दिलेला गुरुमंत्र अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कसा सुकारक होईल ह्या विचारावर संतश्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठानाची 2018 ची स्थापना बुलढाणा आणि जालना जिल्ह्यासाठी करण्यात आल्यानंतर संतश्री भगवानबाबा विद्यार्थी मदतनिधी, वंजारी समाज वधुवर मेळावा ,गाव तिथे अभ्यासिका,विदर्भ वंजारी समाजरत्न सन्मान व गुणवंतांचा कौतुक सोहळा या सर्व संकल्पनांच्या केंद्र हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा व त्याची भविष्यातील शैक्षणिक प्रगती  हीच राहणार असून या सर्व संकल्पना यशस्वी होण्याचे कारण सामान्य समाज बांधवांची साथ हे आहे असे ते म्हणाले .यानंतर मा.गौरवजी कायंदे यांना  प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न या सन्मानाने गौरवण्यात आले त्यानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन प्रवीणजी गीते यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे मनोगते  झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना मा गौरवजी कायंदे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केले.स्वतःच्या यशात त्यांच्या आई-वडिलांचा वाटा मोलाचा आहे असे त्यांनी सांगितले  आयोगाची परीक्षेची तयारी करत असताना अपयशाला भिऊ नका, कठीण परिश्रम ,ध्येय निश्चिती, सातत्य ,मेहनत यांचा जोरावर अशक्य हे काहीच नाही असं  आवर्जून त्यांनी  सांगितलं लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती ,निवड प्रक्रिया विषयाची निवड मौखिक परीक्षा, त्यातील प्रश्न अशा सर्व बाबींचा सखोल माहिती त्यांनी दिली . सत्काराचा स्वीकार करताना ते म्हणाले की माझ्या माणसांनी केलेला हा  सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय झाला ... मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे .यानंतर अध्यक्ष समारोप माजी आमदार तोताराम कायंदे यांनी केला.विविध स्पर्धा परीक्षा मधील त्याचबरोबर  SSC,HSC,MHCET,NEET,JEE यशस्वी झालेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा  स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन आंधळे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सुरेश वनवे यांनी मानले.योगीराज लाॅनच्या माध्यमातून विशेष सहकार्य शरदजी डोईफोडे व किरण डोईफोडे यांचे लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास जायभाये ,समाधान जायभाये ,समाधान घुगे,निलेश वनवे,भीमराव चाटे ,सुरेश वनवे, अविनाश नागरे ,प्रल्हाद कायंदे , डॉ पवन नागरे , राजेश नागरे, गणेश इलग, शरद नागरे, संदीप डोईफोडे ,निलेश गीते ,बाबासाहेब गीते व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले.


आमच्यात सामील व्हा