बातमीपत्र

सुलतानपूर मेहकर राज्य महामार्गावर एसटी बस व दुचाकीत अपघात १ ठार तर २ गंभीर

सुलतानपुर ता .२५सुलतानपूर येथुन गेलेल्या राज्य महामार्गावर  सुलतानपूर पासुन १ किलोमीटर अतंरावर मेहकर रोडवर एस टी बस व दुचाकी मोटर सायकल मध्ये भिषण अपघात होवुन दुचाकी वरील एक जन  जागीच ठार झाल्याची घटणा घडली .
 
सुलतानपुर पासुन जवळच मेहकर रोडवर साडेतीन वाजे चा सुमारास  ही घटना घडली .
अकोला - परतुर MH - 20 -2612  ही एसटी बस मेहकर कडून सुलतानपूर कडे येत होती तर  मोटार सायकल सुलतानपुर वरूण मेहकर कडे जात होती दरम्यान वेगात ओअर टेक करू पाहणाऱ्या एसटी बसने (  एसटी बस चालक गणेश प्रतापसिंह मरपत वय ५६  )ने विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकी वरील तिघांणा एसटी बसची जोरदार धडक बसली त्यात एकाचा जागीच मृत्यु झाला तर दोन जन गंभीर झाले .
सदर अपघात राज्यमहामार्गावरून घडून सुद्धा १०८ या तात्काळ अपघात स्थळी पोचणाऱ्या रुग्णवाही केला अनेक कॉल करुण ही ही रुग्णवाहीका  उशीरा पोचल्याने अपघातस्थळी मदतीसाठी धावलेले युवक संताप व्यक्त करीत होते . तर सतत चे अपघाताचे वाढत्या परिणा माला या महामार्गावरील खड्डेच कारणीभुत असल्याचे बोलल्या जाते
 या अपघातामध्ये दुचाकीवरील युवक ज्ञानेश्वर गजानन चाकोते वय १६ वर्ष राहणार सुलतानपूर हा जागीच ठार .

तर विश्वजीत दिलीप केजकर वय  १६ वर्ष    हल्ली मुक्काम सुलतानपूर , गजानन सिताराम लढाड वय ४० वर्ष कीन्ही नाईक ता. चिखली जि. बुलडाणा  हे गंभीर जख्मी असून जख्मी वर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते .

मृतक ज्ञानेश्वर व जख्मी विश्वजीत ही दोन्ही मुले चिंचोली फाट्यावरील आपल्या पुजारी असलेल्या आजोबांकडे जात होते . मात्र आपल्या कडील पैसे बचत करण्यासाठी मेहकरकडे जाणाऱ्या एका दुचाकी स्वराला हात दाखवुन त्यांच्या मोटारसायकल वर जात असताना हा अपघात घडला .

 

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा