भाळवणी जिल्हा अहमदनगर येथे प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मधे भगवान बाबाच्या मुर्तीचे काम अंतीम टप्प्यात आसतांनी काही अज्ञात इसमानी मुर्तीची तोड फोड करून मुर्ती जाळण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्राला काळीमा फासण्याचा कुविचारी व भ्याडपणाचा कळस केला असुन संत भगवान बाबानी केलेल्या कार्य व संदेशाला काळिमा फासण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ही अत्यंत लाजिरवाणी बाब असुन तिचा करावा तेवढा निषेध कमी आहे परंतु संताचे कार्य हे कधीही खंडणार नाही व भगवान बाबाची किर्ती ही संपणार नाही या प्रकरणातील आरोपीस लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करत वंजारी समाजाच्या वतीने मंठा तालुक्यातील तळणी येथे एक दिवशीय बंद पाळण्यात आला तळणी परिसरातील समाज बांधव व भगवान बाबावर श्रध्दा आसणारे लोक या बंद मधे सहभागी झाले होते.
