मराठवाडयात सर्वधिक निधी खेचून आणत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे केली असून राज्याच्या प्रत्येक मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भाजप सरकारचा भर असून परतूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासाशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन जालना जि. प. चे माजी उपाध्यक्ष राहुल भैय्या लोणीकर यांनी आज केले.मंठा तालुक्यातील किर्तापुर, किर्तापुर तांडा, पेवा, अंभोरा शेळके, खोरवड आणि उस्वद या गावात गावंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम उदघाटन, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शाखा व राहुल भैय्या लोणीकर मित्रमंडळ शाखा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
