महाराष्ट्र राज्य शिक्षण परीषद पुणे यांच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत स्थानीक एस. ई . एस. हायस्कूल मधील नऊ विद्यार्थांनी भाग घेतला होता. सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. ईतर मागास वर्गीय आणि आर्थीक दुर्बल घटकामधील विद्यार्थांची ही परीक्षा असते. जे विद्यार्थी मिरीट यादीप्रमाणे येतात त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. एस ई एस हायस्कूल मधील साक्षी रामेश्वर डोळे , प्रथम , साक्षी विष्णू तुपकर द्वितीय आणि पंलवी दिलीप ईगळे ही तृतीय आली आहे. साक्षी डोळे आणि साक्षी तुपकर ह्या शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही मुलींचा सत्कार प्राचार्य संतोष दसरे यांनी केला. यावेळी संचालक चंद्रशेखर शुक्ल , एस. बी. भगत , रोशन जोशी, किशोर कामे , पी एस तघरे, प्रताप पागोरे, जी एस काळे, समाधान पाझडे उपस्थीत होते.
