मंठा तालुक्यातील बरबडा येथील प्रलंबित असणाऱ्या बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पातील संपादित जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून 168 भूधारकांच्या 157 हेक्टर संपादित जमिनीचा मावेजा मिळवून दिला असून आज 16 कोटी 84 लक्ष रु चे धनादेश वाटप करण्यात येत आहेत, पालकमंत्री लोणीकर हे कायम शेतकरी हितासाठी खंबीरपणे उभे राहणारे नेते असल्याचे मत युवानेते राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले.
बरबडा ता.मंठा येथे आयोजित मावेजा वाटप कार्यक्रम प्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते, यावेळी तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे, सभापती संदीप गोरे, उपसभापती राजेश मोरे, उपविभागीय अधिकारी स्वामी, उपविभागिय अधिकारी डव्हले, बीडी पवार, नाथराव काकडे, नागेश घारे, तहसीलदार सुमन मोरे, गटविकास अधिकारी गुंजकर, अनिल खंदारे, प्रमोद बोराडे, गणेशराव चव्हाळ, शेषणारायन दवणे, मुस्तफा पठाण, बाळासाहेब तौर, अनिल राठोड, पवन केंधळे, मनोज देशमुख, रावसाहेब खरात, राजेभाऊ नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील काळात बबनराव लोणीकर आमदार किंवा माजी आमदार असताना कायम शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांची भूमिका कायम शेतकरी हिताची राहिली होती, आहे आणि राहणार असल्याचे मत यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की, भूसंपादन साठी 17 कोटी 55 लक्ष रु ची मागणी करण्यात आली होती, त्यातील 16 कोटी 84 लक्ष रु चा मावेजा आज वाटप करण्यात येत असून यापूर्वी 2017 या वर्षी 2 कोटी 90 लक्ष रु पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले होते. उर्वरित मावेजा देखील लवकरच मिळेल असे त्यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी शब्द दिला होता त्यानुसार न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील निर्णयापूर्वी संपादित जमिनीचा मावेजा मिळून दिला असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.
