बातमीपत्र

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विविध संपर्क अभियानांपैकी एक महत्वाचे अभियान म्हणजे ‘विजय संकल्प बाईक रॅली‘ विधानसभा स्तरावर आपल्या प्रत्येक युवा कार्यकत्र्यांचा उत्साह वाढविणे आणि त्यांना २०१९ च्या निवडणुकीकरीता अधिक सक्रिय करण्याच्या उद्देशाने तसेच वातावरण निर्मितीसाठी मंठा शहरात विधानसभा स्तरीय ‘विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बबनराव लोणीकर व युवानेते राहुलभैय्या लोणीकर यांच्या उपस्थितीत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दुचाकींना भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावून काढण्यात आलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तळणी फाटा - विडोली फाटा ते शहरातील शिवाजी चौक या ठिकाणापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत १२०० हून अधिक मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा