बातमीपत्र

<span style="\&quot;color:rgb(10," 10,="" 10);="" font-family:roboto,arial,sans-serif;="" font-size:14px\"="">बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव जामोद या मध्यप्रदेश सिमेलगतच्या भागात आदिवासी समुदाय गटा गटाने तसेच गावेच्या गावे बनवून दिर्घकाळापासून वास्तव्यास आहे.आजही स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षानंतर सुध्दा या आदिवासी समुदायाच्या गावांना मुलभूत सोयीसुविधा तसेच इतर भौतिक सुविधेंपासून वंचित ठेवण्यात आले आहे. येथिल स्थानिक राजकारणी आमदार खासदार यांनी व्यक्तीभेद करीत शासनाचे करोडो अब्जोंचा निधी असमानता, तसेच जवळचे कार्यकर्ते यांच्याच गांवामध्ये पुन्हा पुन्हा विकास कामाच्या नावांवर खर्च दाखवलेला दिसतो.अद्याप मात्र भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहचले नाही, अजूनही विद्युत पोहचली नाही, एवढेच काय गावात येण्याजाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे येथिल स्थानिकांना मोटरसायकल सुध्दा ने आण करता येत नाही. दळणवळणा अभावी होत असलेल्या नुकसानीचा या ग्रामस्थांना नेहमीच सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांनी लोकसभा २०१९ च्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला.


आमच्यात सामील व्हा